esakal | 'मी दोषी असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील'
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay rathod

'मी दोषी असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: चौकशीत दोषी आढळलो तर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी बीडमधील एका तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. त्या तरुणीचा संबंध राठोड यांच्याशी आहे, असा आरोप करत विरोधकांनी रान उठवले होते. प्रकरण वाढल्याने त्यावेळेस संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पत्रकारांशी बोलताना राठोडांनी मी जर दोषी असेल तर मुख्यमंत्री कारवाई करतील असं विधान केलं आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने सध्या आमच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे, अशी प्रतिक्रियाही पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संजया राठोड यांनी दिली. तर धनंजय मुंडे यांच्याबद्दल जेंव्हा वाद निर्माण झाला होता त्यापेक्षा तुमच्यावर आरोप झाल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, असं का? हा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील हे अभ्यासू नेते आहेत आणि मी त्यांच्यावर काय बोलणार, असं म्हणून हा प्रश्न राठोड यांनी टाळला.

loading image