
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करून माजी खासदार इम्तियाज जलील त्यांची कोंडी करत आहेत. मात्र, पालकमंत्री शिरसाट यांनी त्यांच्या आरोपांना धुडकावून लावत ‘सोडा हो! त्या इम्तियाज जलील यांच्या आरोपाने काही होणार नाही’ असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले.