
पैठण : येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले आणि बंद पडलेले संत ज्ञानेश्वर उद्यान तब्बल दहा वर्षांनंतर पर्यटकांसाठी प्रजासत्ताकदिनी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी, रविवारी सातशे पर्यटकांनी भेट दिली. प्रत्येकी ३० रुपये तिकीट दर असल्याची माहिती उद्यान उपअभियंता दीपक डोंगरे यांनी दिली.