Ashadhi Wari 2025 : रिंगण सोहळ्याने फेडले पारणे; संत एकनाथ महाराज दिंडी पालखी, पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Sant Eknath maharaj palkhi : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या दिंडी पालखी सोहळ्याची पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू झाल्यानंतर शनिवारी मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथे घोडा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. वारकऱ्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला आणि ग्रामस्थांनी दिंडीचे जल्लोषात स्वागत केले.
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या दिंडी पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले असून शनिवारी (ता.२१) या दिंडीतील पहिले घोडा रिंगण अहिल्यानगर जिल्ह्यातील मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथे झाले.