जिल्ह्यात सुरू झाला स्वच्छतेचा जागर

जिल्ह्यात सुरू झाला स्वच्छतेचा जागर
Published on: 
LTR26B15621- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. ------- जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर --------- जि.प.अध्यक्षांची माहिती ः उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १३ : नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर यांनी केली. त्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत स्तर ते जिल्हा स्तरावर गावांचा विशेष सन्मान केला जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. जिल्हा संनियंत्रण समिती बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भागवत, उपशिक्षण अधिकारी फुलारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उद्धव फड, जिल्हा शालेय स्वच्छता तज्ज्ञ चांगदेव डोपे, मूल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ संजय मोरे उपस्थित होते. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला १३ नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. येत्या ६ जानेवारी २०२७ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. --- ग्रामस्थांना केले जाणार प्रोत्साहित जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत सर्वसमावेशक स्पर्धा राबवून त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमातील आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरिता जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. गावात शाश्वत स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्व ग्रामपंचायती, नागरिक, गाव व तालुकास्तरीय कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीनी सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.