
गंगाखेड : आषाढी वारीसाठी पंढरीला निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) शहरात आगमन झाले. संत जनाबाईंच्या या नगरीत पालखीचे जंगी स्वागत झाले. मार्गावरील गावांत रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे या पालखीचा मुक्काम शहरात होता.