Muktai Palkhi Pujan in Vadigodri : संत मुक्ताबाईंच्या पालखीचे वडिगोद्री येथे टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी स्वागत केले. मुक्ताईनगर ते पंढरपूर पायी प्रवास करणारी ही सर्वात लांब पल्ल्याची दिंडी आहे.
वडिगोद्री (ता. अंबड, जि. जालना ): ‘विठुमाउली, ज्ञानोबा माउली, तुकोबाराय’ आणि ‘आदिशक्ती मुक्ताई’चा जयघोष करीत संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा बुधवारी (ता. १८) दुपारी येथे दाखल झाला. ग्रामस्थांनी पालखीचे भक्तिभावात स्वागत केले. पालखी येथे मुक्कामी होती.