लातुरात आजपासून ५१ तास अखंड संगीत महायज्ञ

लातुरात आजपासून ५१ तास अखंड संगीत महायज्ञ
Published on: 
लातूर ः येथील सरस्वती प्रतिष्ठानच्या मंदिरातील सरस्वती देवी. नवरात्रोत्सवानिमित्त ५१ तास अखंड संगीत महायज्ञ ---- लातूरला ज्ञानसरस्वती प्रतिष्ठान, सरस्वती संगीत महाविद्यालयाचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १४ ः नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्री ज्ञानसरस्वती प्रतिष्ठान, सरस्वती संगीत कला महाविद्यालय आणि मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ता. १५ ते १७ ऑक्टोबर यादरम्यान बार्शी रोडवरील श्री ज्ञानसरस्वती मंदिर संस्थान सभागृहात ५१ तास अखंड संगीत महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड संगीत महायज्ञाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक विभागाच्या संचालक तथा कथ्थक नृत्यांगना आस्था गोडबोले - कार्लेकर, तालमणी डॉ. राम बोरगावकर, कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, तुकाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. ५१ तास अखंडपणे मुंबई येथील पं. प्रदीप चिटणीस यांचे सुश्राव्य गायन, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नाशिकचे पट्टशिष्य अविराज तायडे यांचे गायन, नितीन पवार, नितीन वारे यांचे तबलावादन, प्रा. अनिल डोळे व शिष्यवृंद यांचे तबला सोलो वादन, सोलापूर येथील अनिरुद्ध वाघचौरे यांचे गायन, तसेच नागपूर येथील युवा सितारवादक गरिमा व रिद्धीमा यांचे सतारवादन, श्वेता तंत्रे-पाटील यांचे कथकनृत्य, पुणे येथील तबला वादक पं. अरविंद आझाद, पं. शिवरुद्र स्वामी व शिष्यवृंद याबरोबरच अनेक सुविख्यात कलावंतांचे कलाविष्कार या संगीत महायज्ञाप्रसंगी सादर होणार आहेत. तसेच याप्रसंगी मराठवाड्यातील संगीत शिक्षकांचा, कलावंतांचा सन्मान सोहळा होणार आहे. रसिकांनी या संगीत महायज्ञाप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक तालमणी डॉ.राम बोरगावकर व सुरमणी पं. बाबूराव बोरगावकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. गणेश बोरगावकर, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. नामदेव साठे, सुवर्णा कुंटे, सुनीता बोरगावकर, प्रभारी प्राचार्य डॉ. पांडुरंग गोरे, डॉ. सुदाम पवार, प्रा. तुकाराम येमले, प्रा. श्रीमंत दोरवे आदी परिश्रम घेत आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com