

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
जरंडी: सोयगाव तालुक्यातील सावळदबारा शिवारात शनिवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात शेतकरी दिनकर आबाराव मोरे यांचा दोन एकर कापून ठेवलेला मका आणि दोन एकर सोंगणीला आलेला गहू जळून खाक झाला. तसेच ठिबक आणि स्प्रिंकलर सेटसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.