जेवणाचे डबे तसेच पडून होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. शिक्षक विद्यार्थ्यांना जेवण करा, म्हणून सांगताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रू मावत नव्हते.
छत्रपती संभाजीनगर : पक्ष्यांसारखा किलबिलाट करीत मधल्या सुटीत जेवणाच्या डब्यावर ताव मारणारे विद्यार्थी आज सुन्न झाले होते. एकानेही जेवणाचा डबा उघडला नाही. त्यांच्यासह शिक्षकांच्याही (Teacher) डोळ्यांत अश्रू तरळत होते... कुणाचेही मन हेलावेल असे दृश्य विद्यार्थिनीच्या अचानक जाण्याने शिशुविहार शाळेत सोमवारी (ता. सहा) दिसून आले. राणी वाहुळे या विद्यार्थिनीसारखा हिरा कायमचा गमावल्याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.