
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील हजारो खासगी, विनाअनुदानित, अंशतः आणि पूर्णतः अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविना धडपडत आहेत. माध्यमिक शाळांना आकृतिबंध लागू असताना प्राथमिक शाळांना शिक्षकेतर कर्मचारी देण्यास शासन नकार देत असल्याने शिक्षकांना झाडू हातात घ्यावा लागत आहे, तर कधी लिपिकाचे काम करावे लागत आहे.