
नांदेड : पैसे देऊन पदे विकल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी (ता. २२) दुपारी बाराच्या सुमारास फ्री स्टाइल हाणामारी झाली. शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या प्रकारामुळे या पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला.