
छत्रपती संभाजीनगर : आंघोळ करताना आलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’, अशी धमकी देत महिलेसह संशयित आरोपींनी १४ लाख ६६ हजार रुपये उकळले. २३ मार्च ते २८ एप्रिलदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.