Paithan News: आता आम्हीही झालो साक्षर!; पैठणच्या ३५० ज्येष्ठांनी दिली मूल्यांकन परीक्षा

Emotional and Social Impact of Literacy: पैठण तालुक्यात ३५० ज्येष्ठांनी साक्षरता मूल्यांकन परीक्षा दिली. ५०–७० वयोगटातील नागरिकांनी शिकण्याची प्रचंड जिद्द दाखवली आणि डिजिटल युगाशी जुळण्याचे प्रयत्न केले.
Paithan News

Paithan News

esakal

Updated on

जायकवाडी: पैठण तालुक्यात निरक्षरता निर्मूलनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. रविवारी (ता. २९) तालुक्यातील ३१ केंद्रांवर तब्बल ३५० निरक्षर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘साक्षरता मूल्यांकन परीक्षा’ दिली. या परीक्षेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ५० ते ७० वयोगटातील आजी-आजोबा, आई-बाबा आणि काकूंनी दाखवलेली शिकण्याची प्रचंड जिद्द.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com