Heat Wave: पैठण तालुक्यात सात उष्माघात नियंत्रण कक्ष सज्ज

Heat Wave: उष्माघाताच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने वेळेत उपचार व्हावेत, याची दक्षता घेण्यात आली आहे.
Heat Wave
Heat WaveSakal

उष्माघातामुळे मृत्यू होऊ नये यासाठी पैठण पंचायत समिती अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यासाठी तालुक्यातील एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. कक्षात बेडसह प्रथमोपचाराच्या औषधांचा कीट आणि आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. यंदा तालुक्यात उष्माघाताच्या मृत्यूची घटना तालुक्यात घडलेली नाही.

परंतु, यंदा तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने वेळेत उपचार व्हावेत, याची दक्षता घेण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अशी घ्या दक्षता

डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री वापरा, दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाश आडवावा, पुरेसे पाणी, ताक, लिंबू/नारळपाणी घ्या, उन्हात शारिरिक कष्टाची कामे टाळावेत, दुपारी स्वयंपाक करू नये, अनवाणी चालू नये, लहान मुलांना आत ठेवून वाहन बंद करू नका, मद्य, चहा, कॉफीचे सेवन टाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

Heat Wave
Nutritional Food: पोषण आहाराचा ‘दुष्काळ’, दुष्काळग्रस्त भागातील ग्रामीण विद्यार्थी वंचित

एखाद्या व्यक्तीला वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याला वेळेत व तातडीने उपचार मिळावेत, यासाठी स्थानिक पातळीवर सात आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापना केले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आरोग्य यंत्रणा करत आहे.

-सय्यद अझर, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पैठण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com