
छत्रपती संभाजीनगर : विश्वासाने आपले घर समजून, पाहुण्यांच्या साक्षीने आणाभाका घेत ज्याच्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली, तो आणि त्याचे कुटुंबीय हुंडा आणि इतर कारणांसाठी आता छळ करत आहेत. उंबऱ्याबाहेर काढत आहेत, अशा विविध भागांतील सात विवाहितांनी पोलिस ठाणे गाठत आपबीती कथन केली. त्या आधारे संबंधितांवर गुन्हे नोंद झाले.