
छत्रपती संभाजीनगर : पोलिस विभागातील उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल सात जणांना राष्ट्रपतीं पोलिस पदक जाहीर करण्यात येणार आहे. आज (ता.२६) मुख्य शासकीय ध्वजवंदनाप्रसंगी या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पदक जाहीर झालेल्यांमध्ये इंटलीजन्स ब्यूरो आणि ग्रामीण पोलिस दलातील प्रत्येकी एक आणि शहर पोलिस दलातील पाच अंमलदारांचा समावेश आहे.