Farmer News : देशात शेतकरी आत्महत्या थांबेनात!

महाराष्ट्रात तीन वर्षांत सर्वाधिक सात हजार घटना
seven thousand Farmer suicides in three years Maharashtra marathwada aurangabad
seven thousand Farmer suicides in three years Maharashtra marathwada aurangabadfarm

औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा नेहमीच मुद्दा केला जातो. त्यावर राजकारणही भरपूर होते मात्र शेतकरी आत्‍महत्येत घट होताना दिसत नाही. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत कालावधीत देशात १६ हजार ८५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

यात सर्वाधिक ७ हजार ८८७ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात तीन हजार ५७३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा पुढे केला जातो.

मात्र, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस असा कोणताही कृती कार्यक्रम आखला जात नाही. मागील तीन वर्षांत मोठी घट अपेक्षित असताना या आकडेवारीत फारसा बदल झाला नाही. महाराष्ट्रात २०१९ मध्ये दोन हजार ६८०, २०२० मध्ये दोन हजार ५६७ तर २०२१ मध्ये दोन हजार ६४० तर देशात २०१९ मध्ये पाच हजार ९५७, २०२० मध्ये पाच हजार ५७९ तर २०२१ मध्ये पाच हजार ३१८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

एक हजार आत्महत्या

मराठवाड्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत १ हजार २३ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यात पात्र प्रकरणे ही ८४४ होती तर अपात्र प्रकरणे १३९ राहिली तर ४० प्रकरणे प्रलंबित आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ६२ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यामध्ये १२ प्रकरणे पात्र ठरली तर ५० प्रकरणांची चौकशी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com