esakal | 'पीएम केअर्स'च्या १७ व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad High Court

गेल्या दोन महिन्यांपासून खंडापीठासमोर कोविडशी संबंधित जनहित याचिकांची सुनावणी सुरु आहे.

'पीएम केअर्स'च्या १७ व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : औरंगाबादला (Aurangabad) केंद्र सरकारच्या पीएम केअर्स फंडातून (PM Cares Fund) मिळालेल्या १५० व्हेंटिलेटर्सपैकी १७ व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी होत्या. त्या रुग्णांच्या जीवाला धोकादायक ठरु शकल्या असत्या, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी (Aurangabad Bench) खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. डेबडवार यांच्यासमोर टिपणच्या माध्यमातून मंगळवारी (ता.२५) सादर केली. याबाबतचे वृत्त 'द हिंदू' या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी असल्याने कमी दाब आणि अपुरा ऑक्सिजन पुरवठा रुग्णाला होत होता. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. (Seventeen Ventilators Flaws Which Got Through PM Cares, Hospital Inform High Court Bench)

हेही वाचा: कोव्हॅक्सिन लसींचा घोळ, औरंगाबाद महापालिकेच्या नोटिसा

न्यायालय म्हणाले, की उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याला वितरित केलेले ५५ व्हेंटिलेटर्स आणि ४१ जी की खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या होत्या. त्याचे शुल्क रुग्णांकडून घेतले जाऊ शकत नाही. जी ३७ व्हेंटिलेटर्स औरंगाबाद येथील दवाखान्यातून पुरवण्यात आली ती पडून आहेत. अधिष्ठाताने लिहिले आहे, की चालू नसलेली आणि सदोष व्हेंटिलेटर्स प्रशासनाने परत घ्यावे. लोकप्रतिनिधींकडून व्हेंटिलटर्सची पाहणी करण्यात येत आहे. त्यांचे वैद्यकीय सुविधांशी काही संबंध नाही. फक्त त्यांनी त्याला राजकीय रंग देऊ नये, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. आम्हाला असे निदर्शनास आले आहे, की सदोष व्हेंटिलेटर्स जी पीएम केअर्समधून मिळाली आहेत त्यांची स्थिती गंभीर आहे. व्हेटिंलेटर्सबाबत कोणती पावले उचलली गेली याची माहिती २८ मे रोजी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने अतिरिक्त सरकारी वकीलांना आज दिले. गेल्या दोन महिन्यांपासून खंडपीठासमोर कोविडशी संबंधित जनहित याचिकांची सुनावणी सुरु आहे.