esakal | औरंगाबाद : अन तिने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

रुग्णालयापर्यंत जाण्या आधीच तीने रुग्णवाहिकेतच गोंडस मुलीला जन्म दिला.  रविवारी (ता.२१)  दाभरुळ (ता.पैठण) शिवारात ही घटना घडली. बाळंतीण व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तर रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तिची सुखरूप प्रसूती केली.

औरंगाबाद : अन तिने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आडुळ (औरंगाबाद) : प्रसुती साठी गरोदर मातेला १०८ रुग्णवाहिकेत टाकुन आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असतांना अचानक गरोदर मातेला प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णालयापर्यंत जाण्या आधीच तीने रुग्णवाहिकेतच गोंडस मुलीला जन्म दिला.  रविवारी (ता.२१)  दाभरुळ (ता.पैठण) शिवारात ही घटना घडली. बाळंतीण व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तर रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तिची सुखरूप प्रसूती केली.

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

पुजा आप्पासाहेब चिंतामणी वय २२ वर्षे, राहणार आडगाव जावळे (ता.पैठण) या गरोदर मातेला रविवारी (ता.२१) रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिच्या नातेवाईकांनी आडुळ येथील १०८ रुग्णवाहिकेला कॉल करुन बोलावले. कॉल आल्यावर रुग्णवाहिकेवरील डॉ. अस्लम सय्यद व चालक नासेर सय्यद यांनी आडगाव जावळे येथे जावुन सदरील महिलेला रुग्णवाहिकेत घेतले व आडुळ कडे निघाले.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
माञ रुग्णवाहिका दाभरुळ शिवारात आल्यानंतर त्या महिलेला जास्त ञास होत असल्याने रुग्णवाहिकेवरील डॉ. अस्लम सय्यद यांनी समयसुचकता दाखवत त्या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती केली.  महिलेनी एका गोंडस मुलीला जन्म दिला असुन बाळ व माता सुखरुप आहेत. प्रसुती नंतर या महिलेला आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

 पोस्टाच्या कारभारास नागरिक वैतागले, पैसे मिळण्यास अडचण 
खुलताबाद : तालुक्यासाठी असलेले डाकघर कार्यालय असुन अडचण नसुन खोळंबा या उक्तीप्रमाणे कारभार हाकत आहे. या ठिकाणी बचत खाते धारकांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सदरील डाकघराचा कारभार अवघ्या एक दोन कर्मचारयांवरच चालविला जात आहे. शहरासह, तालुक्यातील असंख्य ग्राहकांनी या ठिकाणी बचत खाते उघडलेली असुन, या बचत खात्यात जमा असलेली रक्कम त्यांना मिळण्यास अडचण येत आहे. डाकघर कर्मचारी या बाबत सहकार्य करीत नसल्याचे खाते धारक रत्नपारखे यांनी सांगितले.  
 

loading image
go to top