

Education
sakal
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील शेवता खुर्द आणि शेवता बुद्रुक गावांमधून जाणाऱ्या गिरिजा नदीच्या प्रवाहामुळे दोन्ही गावांचा रस्ता संपर्क दोन महिन्यांपासून तुटला आहे. त्यामुळे शेवता बुद्रुक येथील पहिली ते सातवीच्या सुमारे ४२ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ आली आहे.