शाळेची निजामकालीन इमारत घोड्यांचा तबेला

शाळेची निजामकालीन इमारत घोड्यांचा तबेला
Published on
फोटोसह ABD26J78460, ABD26J78461 शेवाळा ः येथील निजामकालीन जि. प. शाळेची जीर्ण झालेली इमारत. (दुसऱ्या छायाचित्रात) शाळेच्या वर्गखोलीत बांधलेला घोडा. ------------ जि. प. प्रशालेची जुनी इमारत घोड्यांचा तबेला ------ शेवाळ्यात विद्यार्थी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष --------- रंगनाथ नरवाडे शेवाळा, ता.२ ः शेवाळा (ता. कळमनुरी) येथे १९१९ मध्ये स्थापना झालेल्या जि. प. प्रशालेच्या निजामकालीन जुन्या इमारतीत एकीकडे अंगणवाडीतील चिमुकले शिक्षण घेतात तर काही खोल्यांत ग्रामस्थ आपली जनावरे, घोडे बांधत आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधी काळी जिल्ह्यात लौकीक असलेल्या या शाळेच्या जुन्या इमारतीची सद्यस्थितीत मात्र दुरवस्था झाली आहे. या शाळेत इयता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. हि इमारत जीर्ण झाल्याने बाजूच्याच जागेत १९ जुलै २०१९ मध्ये तत्कालीन खासदार हेमंत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवराणी नरवाडे, जिल्हा प्रमुख गोपु पाटील यांच्या हस्ते जि.प. माध्यमिक शाळेच्या नविन दुमजली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दुमजली इमारतीत २०२१ पासून नवीन इमारतीत शाळा सुरू करण्यात आली. शाळेच्या या नवीन इमारतीत विद्यार्थी जुन्या निजामकालीन इमारतीजवळूनच जावे लागते. शिवायलगतच आरोग्य उपकेंद्राची इमारत असुन जन्या शाळेच्या वर्ग खोल्यांत अंगणवाडी भरवली जाते. मात्र काही खोल्यांत ग्रामस्थ चक्क आपली जनावरे, घोडे बांधत असून जून्या इमारतीस तबेल्याचे स्वरूप आले आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली अंगणवाडीतील चिमुकल्यांसह ईतर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ((चौकटःःः इमारत बनली धोकादायक संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय कन्या शाळेची जुनी धोकादायक बनलेली इमारत पाडावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जून्या इमारतीस तत्काळ पाडणे गरजेचे असून शिक्षण विभागाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. -------------------- एकेकाळी जिल्ह्यात लौकीक परभणी, हिंगोली जिल्ह्यांत शेवाळा जि.प. प्रशालेचा मोठा लौकिक होता. त्यामुळे या शाळेत शेवाळा, देवांना, कवडी, येगाव पिंपरी, कान्हेगाव, पिंपरी, दाती, आडा, चिखली, फुटाणा, कांडली, साळवा, येलकी, येहळेगाव, घोडा कामठा, रुपुर व नांदेड जिल्ह्यातील नेवरी परिसरातील शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येत असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com