

Residents of three hamlets in Shirapur face a prolonged water shortage and demand urgent restoration of water and electricity supply.
esakal
आष्टी, : तालुक्यातील शिरापूर ग्रामपंचायत हद्दीतील जिवे वस्ती, उकांडे वस्ती आणि गिलचे वस्ती येथील नागरिकांना २५ दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच घरगुती वीजपुरवठाही बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांची परवड होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.