
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्रिपदावरून महिनाभर सुरू असलेला शिवसेना-भाजप संघर्ष अखेर मिटला. ‘पालकमंत्री बदलण्याची वेळ आलीच तर मी आणि अतुल सावे पालकमंत्रिपद एक्स्चेंज करू; पण दोघांत तिसरा येऊ देणार नाही’, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी (ता. दोन) स्पष्ट केले. काही संघटनांनी शहरात आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.