

School Safety
esakal
शिरूर कासार,: विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या चिमुकल्यांच्या डोक्यावर सध्या एका मोठ्या धोक्याची टांगती तलवार आहे. शिरूरकासार तालुक्यातील तागडगाव येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत इतकी जीर्ण झाली आहे की, ती कधीही कोसळेल या भीतीने पालकांच्या काळजात धडकी भरली आहे. येथील २४ निष्पाप विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि नव्या इमारतीच्या मागणीसाठी अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.