
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी नेत्यांमधील गटबाजी कायम असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा उघड झाले. शहरातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘आजही शहरात माझीच क्रेझ आहे, मीच मोठा नेता’ असे वक्तव्य करून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना डिवचले.