बीड शहराजवळील पालवण

बीड शहराजवळील पालवण
Published on: 
ABD26J82979 शिवरायांच्या चरणी पहिला दीप बीड : शहराजवळील पालवण येथील शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत ग्रामस्थांनी दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित केला. दीपावलीच्या प्रारंभी गावातील तरुण आणि ग्रामस्थ शिवतीर्थावर एकत्र आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवरायांच्या चरणी पहिला दीप लावण्यात आला. पणत्यांच्या प्रकाशाने शिवतीर्थ परिसर उजळून निघाला. यावेळी अशोक पवार, गोविंद मस्के, योगेश भड, सक्षम मस्के, अक्षय पवार यांच्यासह गावातील तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ----- ABD26J82978 तारेला धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू बीड : विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा उघड्या विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. नऊ) पिंपळवाडी (ता. जि. बीड) येथे घडली. बबन उत्तम दहिवाळ (वय ६०) असे मृताचे नाव आहे. बबन दहिवाळ सोमवारी विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी पायाजवळ असलेली विद्युत तार उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. त्यांचा मुलगा जवळच उभा होता. वडील खाली पडल्याचा आवाज येताच त्याने मोटारीकडे धाव घेतली. मात्र, विजेच्या धक्क्याने बबन दहिवाळ यांचा जागीच मृत्यू झाला. ----- फळबागा वाचविण्यासाठी मदतीची मागणी पिंपळवंडी : पाणीटंचाईमुळे फळबागा वाळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या बागा वाचविण्यासाठी शासनाने हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भाऊसाहेब पवार यांनी केली. पाटोदा तालुक्यातील दौलतवाडी येथे शुक्रवारी पवार यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह फळबागांची पाहणी केली. सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण पवार यांच्या शेतातील पेरू, आंबा, मोगली लिंबू आणि महोगनीच्या झाडांची पाहणी करण्यात आली. मराठवाड्यातील शेतकरी कष्टाने फळबागा आणि वृक्षसंपदा जोपासत आहेत. मात्र, पाण्याअभावी या बागा धोक्यात आल्या आहेत. फळबागा वाचविण्यासाठी आच्छादन, ठिबक सिंचन आणि टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. नुकसान टाळण्यासाठी शासनाने हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी, असे पवार यांनी सांगितले. यावेळी औषधी वनस्पतीतज्ज्ञ डॉ. अनिल जाधव यांनी महोगनी आणि करंजीच्या झाडांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तलाठी अमोल मस्के, कृषी सहायक राऊत, उद्धव पवार, सरपंच अशोक जेधे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.