
छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी पलायन केल्यानंतर, शासनाने बालगृहाची मान्यता रद्द केली. आता पुन्हा एकदा गंभीर प्रकाराने हे बालगृह चर्चेत आले. यात एका प्रकरणात अत्याचारातील १७ वर्षीय पीडितेवर न्यायालयात खोटा जबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले.