
बजाजनगर : छत्रपती संभाजीनगरकडून वाळूजकडे जाणाऱ्या महामार्गावरील कामगार चौकामध्ये दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की ट्रकने तब्बल ५०० फुटांपर्यंत दुचाकीस्वाराला फरफटत नेत चिरडले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सोमवारी (ता. १२) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.