बाजार समितीत शेतकऱ्याला बेदम मारहाण

बाजार समितीत शेतकऱ्याला बेदम मारहाण
Published on: 
डाळिंब घेऊ नका म्हणताच शेतकऱ्याला बेदम मारहाण -- जाधववाडी, ता. ११ ः डाळिंब फेकू नका म्हणताच रागाचा पारा चढलेल्या एकाने शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. या प्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. करण संजय कणसे (२१, रा. गणपती मंदिराजवळ, जाधववाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दुधड येथील शेतकरी भुजंग बाबासाहेब चौधरी (४०) हे शनिवारी (ता. १०) पहाटे डाळिंब विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आले होते. दरम्यान, करण हा भुजंग यांच्याजवळ आला. त्याने कॅरेटमधून डाळिंब घेतले आणि खाल्ले. तसेच उर्वरित डाळिंब फेकून दिले. त्यावर फिर्यादी भुजंग यांनी डाळिंब फेकू नका, असे म्हटले. त्यावर करण याने, डाळिंब सडके आहे म्हणून फेकून देत असल्याचे सांगितले. यावर फिर्यादीने तुम्ही डाळिंब घेऊ नका, असे म्हणताच रागाचा पारा चढलेल्या करणने फिर्यादीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच हातातील कड्यानेही डोळ्यावर प्रहार केला. यात शेतकरी भुजंग गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. तपास सहायक उपनिरीक्षक नासेर शेख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com