माहूर: तालुक्यातील मौजे बामनगुडा येथे कापूस वेचणाऱ्या महिलेवर वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी घडली. तोंड वन्यप्राण्याच्या जबड्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली. .Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?.बामनगुडा येथील महिला लता सुरेश तोडसाम (वय ३५) मंगळवारी दुपारी पती आणि मुलासोबत कापूस वेचत होती. काही वेळाने पती सुरेश घरी गेले. त्यानंतर वन्यप्राण्याने महिलेवर झडप घातली. जबड्यात मुंडके पकडून चावा घेतल्याने महिलेच्या गालावर गंभीर जखम झाली. तसेच कपाळ, मानेवरही प्राण्याचे दात खोलवर रुतले. मुलाने आणि शेजाऱ्याने आरडाओरड केल्यामुळे प्राण्याने पळ काढला. जखमी महिलेवर सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. बी.एम. मोरे यांनी प्रथमोपचार केले..पुढील उपचार माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. मंगेश नागरगोजे यांनी केले. त्यानंतर डॉ. सत्यम गायकवाड, चालक सिद्धार्थ भालेराव यांनी महिलेला यवतमाळला पाठवले. दरम्यान, वन विभागाने हिंस्र वन्यप्राण्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..दरम्यान, घटनास्थळी सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर, वनपाल शहाजी डोईफोडे, वनरक्षक विशाल सोनुने, संतोष तिळेवाड यांनी पाहणी केली. त्यांना जायमोक्यावर अस्वलाची विष्टा आढळली..आनंदाची बातमी! 'पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास लवकरच १६० किमी वेगाने'; प्रवाशाच्या वेळेची हाेणार बचत...महिलेवर हल्ला केलेल्या वन्यप्राण्याचे पुरावे विष्ठेवरून सिद्ध झाले. वन विभागाकडून जखमी महिलेला आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रकरण दाखल करण्याच्या सूचना त्यांच्या नातेवाइकांना दिल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी वन्यप्राण्याचा वावर दिसून आल्यास वन विभागाला कळवावे.- संतोष शिरसटवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, मांडवी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.