छत्रपती संभाजीनगर : श्री गजानन महाराज (शेगाव) मंदिर विश्वस्त मंडळाकडून दरवर्षी विदर्भ पंढरी शेगावपर्यंत काढण्यात येणाऱ्या श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी या श्रींच्या पायी पालखी सोहळ्याला शनिवारपासून सुरवात होणार आहे..शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेली ही पालखी दहा दिवसांचा प्रवास करून ३० डिसेंबरला श्री गजानन महाराजांच्या शेगावनगरीमध्ये दाखल होणार आहे. या पायी पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरात नोंदणी सुरू आहे..या पायी पालखी सोहळ्याला ता. २१ पासून सुरवात होणार आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त या पायी दिंडी पालखी सोहळ्याची सुरवात करण्यात आली होती. समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त सुरू झालेला हा पायी दिंडी पालखी सोहळा आता वार्षिक झाला आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा दिंडी संचालक डॉ. प्रवीण वक्ते म्हणाले, ‘‘दहा दिवसांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. विदर्भ-मराठवाड्यातील विविध भजनी मंडळे व भक्तांसह २१ ते ५० वयोगटातील पुरुष भक्तांना यंदा सहभागी करून घेण्यावर भर राहणार आहे.’’.पायी पालखीचा मार्ग२१ डिसेंबर : सावंगी मुक्कामी२२ डिसेंबर : चौका, फुलंब्री, खामगाव फाटा मुक्काम२३ डिसेंबर : बनकिन्होळा, सिल्लोड कारखाना, सिल्लोड२४ डिसेंबर : पिंप्री, भोकरदन, विरेगाव२५ डिसेंबर : माहोरा, म्हसला, धाड२६ डिसेंबर : दुधा घाट, हातेडी, बुलडाणा२७ डिसेंबर : बुलडाणा घाट, वाघझळा फाटा, मोताळा२८ डिसेंबर : शेंबा, तरवाडी फाटा, पिंपळगाव राजा२९ डिसेंबर : जळका भडंग, खामगाव, संतपीठ शेगाव मुक्काम३० डिसेंबर : संतपीठ शेगाव इथून निघून शेगाव मंदिर परिसरात दाखल होईल.Ahmedpur Crime News : विष पाजून मुलाकडून जिवे मारण्याचा प्रयत्न; उपविभागीय कार्यालयात आईची तक्रार.पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गारखेडा परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर येथे नोंदणीला सुरवात झाली आहे. वारकऱ्यांची संख्या मर्यादित राहणार असल्याने पुढील नियोजनाच्या दृष्टीने इच्छुक भक्तांनी गारखेडा येथे मंदिरात नाव नोंदणी करावी.- डॉ. प्रवीण वक्ते, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.