तब्बल १९ हजार नागरिकांची

तब्बल १९ हजार नागरिकांची
Published on
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात १९ हजार नागरिकांची तपासणी ----- लातूर, ता. २२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. हे अभियान २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. लातूर जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबरदरम्यान ३२२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १९ हजार ३४७ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविण्यात आले. तपासणी झालेल्यांमध्ये ८ हजार ३६७ पुरुष, ९ हजार १५१ महिला आणि १ हजार ८२९ बालकांचा समावेश आहे. ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील सार्वजनिक आरोग्य संस्था, धर्मादाय नोंदणीकृत आरोग्य संस्था, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांचा या अभियानात सहभाग आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याने नागरिकांनी तसेच भाविकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन लातूर येथील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com