फोटोसह
------------
श्री अष्टभुजा देवी, परभणी
परभणी ः श्री अष्टभुजा देवी मंदिरात रविवार (ता.११) विधिवत घटस्थापना करण्यात आली. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवात रोज पहाटे पाचला देवीची पूजा, सकाळी सातला आरती, तर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सप्तशती पाठ व हवन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत हवन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात शतचंडी हवन हे विशेष आकर्षण असणार आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री अष्टभुजा देवी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, सचिव किशनराव झाडे, उपाध्यक्ष रामकृष्ण शहाणे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव शहाणे, सहसचिव नीलिमा गुप्ता, विश्वस्त संतोष अग्रवाल व शिवाजी विभुते यांच्यासह श्री अष्टभुजा देवी मंदिर युवा संघटनेचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.
-------