फोटो- श्री हिंगुलांबिका देवी
श्री हिंगुलांबिका नवरात्र महोत्सवाची धुरा महिलांच्या हाती
-----
शीतल तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी जाहीर, जय्यत तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ ः येथील भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा होणाऱ्या श्री हिंगुलांबिका नवरात्र महोत्सवाच्या आयोजनात यंदा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्र महोत्सवाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन प्रथमच महिलांच्या हाती सोपवण्यात आले आहे. २०२६ च्या उत्सवासाठी सर्वसमावेशक महिला कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शीतल तांदळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श घालत स्थापन करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संगीता हिबारे व ज्योती कंकाळ यांची निवड झाली आहे. सचिवपदाची जबाबदारी शिल्पा फटाले, उमा ढगे व सुनीता महिंद्रकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून प्रीती सोनकर, श्वेता पेंडकर, अक्षता तेरकर आणि पल्लवी गर्जे कामकाज पाहणार आहेत.
नवरात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक, सामाजिक व कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक अध्यक्ष म्हणून दीप्ती हिरास, नेहा कंकाळ, मीरा शेंडगे, डॉ. स्मिता वडे, रजनी तांदळे, मनीषा कटारे, अन्नपूर्णा शेंडगे, अंबिका हिबारे आणि माधुरी तांदळे यांची निवड करण्यात आली आहे.
उत्सवाचे नियोजन व शिस्तबद्धतेसाठी व्यवस्थापक म्हणून रोहिणी तेरकर, वर्षा कंकाळ, श्रद्धा तांदळे, अनुराधा तांदळे, पूनम पतंगे, दीपा तेरकर, दीप्ती तांदळे व अन्नपूर्णा झिंगाडे काम पाहतील. कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सोनाली कंकाळ व पल्लवी ढगे यांच्याकडे राहील. तसेच देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या देखरेखीसाठी गठीत करण्यात आलेल्या मिरवणूक समितीत वैष्णवी गर्जे, राधिका महिंद्रकर, मयूरी कालेकर आणि भाग्यश्री हंचाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
----