श्रीराघवेंद्र स्वामी पुण्यतिथी महोत्सवात भक्तीचा उत्साह

श्रीराघवेंद्र स्वामी पुण्यतिथी महोत्सवात भक्तीचा उत्साह
Published on
फोटो- राघवेंद्र स्वामी ABD26J78352 ओळ ः श्रीराघवेंद्र स्वामी पुण्यतिथी महोत्सवात सहभागी भाविक. -- श्रीराघवेंद्र स्वामी पुण्यतिथी महोत्सवात भक्तीचा उत्साह तीन दिवस अभिषेक, प्रवचन, पालखी सेवा व महाप्रसाद; शेकडो भाविकांचा सहभाग छत्रपती संभाजीनगर,ता.३१ ः श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात शारदाश्रम कॉलनी येथील श्रीराघवेंद्र स्वामी मठात श्रावण कृष्ण प्रतिपदा ते तृतीया अर्थात २९, ३० आणि ३१ ऑगस्टदरम्यान श्रीराघवेंद्र स्वामींचा पुण्यतिथी महोत्सव पार पडला. तीन दिवस विविध धार्मिक विधी, अभिषेक, स्तोत्र पारायण, प्रवचने, पालखी सेवा, मंगलारती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शहरातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदविला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.२९) श्रींच्या वृंदावनास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र स्तोत्र पारायण व अष्टोत्तर सेवा झाली. सोलापूर येथील गायिका वैशाली देशपांडे यांच्या गायनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. पालखी सेवा, मंगलारती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सुमारे २५० भाविक उपस्थित होते. त्यानंतर रविवारी (ता.३०) स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अभिषेक व अष्टोत्तर सेवेनंतर पंडित नरसिंहाचार्य वरखेडकर यांचे प्रवचन झाले. आरती व प्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या दिवशी सुमारे ६०० भक्त सहभागी झाले होते. तर सोमवारी (ता.३१) उत्तराराधनेनिमित्त नित्यसेवा व जयेशाचार्य पेडगावकर यांचे प्रवचन झाले. मंगलारती व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com