

Five gates of Siddheshwar Dam opened to release 2,500 cusecs of water into the Purna River
esakal
हिंगोली : परभणी आणि पूर्णा या दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून शनिवारी (ता. १४) सकाळी ११ः२० ला पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे पाच दरवाजे प्रत्येकी ३० सेंटिमीटरने उचलण्यात आले असून, त्यातून सध्या सुमारे २ हजार ५०० क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडले जात आहे.