

Allegations of high commissions and arbitrary test charges have raised concerns over pathology lab practices in Sillod.
esakal
सिल्लोड : रुग्ण आजारी पडला की तो मोठ्या आशेने आणि विश्वासाने दवाखान्याची पायरी चढतो. मात्र, सध्या सिल्लोड शहरात आजाराचे निदान करण्यासाठी थाटण्यात आलेल्या काही पॅथॉलॉजी लॅब म्हणजे निव्वळ ‘कमिशनखोरीचे अड्डे’ बनल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तपासणीसाठी पाठवलेल्या प्रत्येक चिठ्ठीमागे ५० ते ७० टक्क्यांपर्यंतचे घसघशीत कमिशन थेट काही डॉक्टरांच्या खिशात जात असून, लॅबचालकांनी लावलेल्या मनमानी दरांवर प्रशासनाचा कसलाही वचक राहिलेला नाही.