
औरंगाबाद : सिल्लोडमध्ये दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित
सिल्लोड : तालुक्यात चढ्या दराने, खते, बियाणांची विक्री होत असून, कृषी विभागाच्या पथकाने बनावट शेतकरी ग्राहक पाठवून शहरातील दोन कृषी सेवा केंद्रांवर चढ्या दराने खतांची विक्री केल्यामुळे कालिंका कृषि सेवा केंद्र व एकता ऍग्रो या दोन दुकानांचा परवाना निलंबित केला. हि कारवाई जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी दिपक गवळी, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक संतोष चव्हाण, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या पथकाने केली.
शनिवारी शहरातील कृषी सेवा केंद्रांवर डमी ग्राहक पाठवून खतांची चढ्या दराने विक्री होत असल्याची शहानिशा कृषी विभागाच्या पथकाने केली असता, यामध्ये कालिंका कृषी सेवा केंद्र व एकता ऍग्रो यांनी जास्त दराने खतांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने या दोन्ही केंद्रांचे परवाने निलंबित केले. बियाणे, खते विक्री करतांना शेतकऱ्यांना चढ्या दराने विक्री केल्यास दुकानांचे परवाने निलंबित करण्यात येतील. मोहिम यापुढेही सुरू राहणार असून, कृषी निविष्ठा दुकानदारांनी ठरवून दिलेल्या दरानेच विक्री करावी अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.
-दीपक गवळी, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद
Web Title: Sillod Two Agricultural Service Centers License Suspended
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..