प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने

प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने
Published on: 
प्रकल्पांतील गाळ काढा, जलसाठ्याची क्षमता वाढवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; स्वखर्चाने गाळ नेण्यासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा ----- लातूर, ता. १८ : जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला असून, अनेक ठिकाणी तळातील गाळ उघडा पडला आहे. या गाळाचा उपसा केल्यास प्रकल्पांची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या जलसाठ्यांमधून स्वखर्चाने गाळ घेऊन जावा. यासाठी जलसंपदा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून आवश्यक परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी रविवारी केले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जलसाठे पूर्णतः कोरडे पडले आहेत. या जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे दिसून येत आहे. जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने शेतकरी आणि नागरिकांना स्वखर्चाने गाळ काढून नेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गाळ काढण्यासाठी आणि तो वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेला अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळासह जलसंपदा विभागाने गुगल फॉर्मद्वारे ही सुविधा उपलब्ध केली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी फॉर्म भरून आवश्यक परवानगी घ्यावी आणि जलसाठ्यांची क्षमता वाढविण्याच्या उपक्रमात प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘जलसेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या माध्यमातून जलसाक्षरतेची मोहीम हाती घेण्यात आली होती. पाण्याची बचत ही काळाची गरज असून, प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही डॉ. बास्टेवाड यांनी केले. ----- LTR26B15383 लातूर : पावसाअभावी कोरडा पडलेला मांजरा नदीवरील नागझरी बॅरेज. (छायाचित्र : सुपर्ण जगताप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com