
छत्रपती संभाजीनगर : कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने सहा जणांना धडक दिली. शुक्रवारी (ता. चार) सकाळी सिडको एन-१ येथील भक्ती गणेश मंदिरासमोर घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला. पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा विद्ध्वंस कारणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.