Aurangabad : लग्नाहून परतणाऱ्या वाहनाचा अपघात; ६ जण जागीच ठार, १४ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Accident News
Aurangabad : लग्नाहून परतणाऱ्या वाहनाचा अपघात; ६ जण जागीच ठार, १४ जखमी

Aurangabad : लग्नाहून परतणाऱ्या वाहनाचा अपघात; ६ जण जागीच ठार, १४ जखमी

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-कन्नड राज्य महामार्गावर गुरुवार (ता.30) रोजी पहाटेच्या सुमारास उसाने भरुन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पिकअप व्हॅन धडकून झालेल्या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार, तर 14 जण जखमी झाल्याची घटना घडली. भीषण अपघाताची माहिती अशी की, घाटशेंद्रा (ता.कन्नड) येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे मंगरूळ (ता.सिल्लोड) (Sillod) येथे येत असताना सिल्लोड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोढा फाटा येथे उसाने भरलेला ट्रॅक्टरवर पिकअप व्हॅन (MH 20 CT 2981) आदळून मोठा अपघात (Aurangabad) घडला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की पीकअप वाहनाचे दोन तुकडे होऊन वाहन अस्ताव्यस्त झाले. (Six People Died, 14 Injured In Accident In Sillod Taluka Of Aurangabad)

हेही वाचा: Aurangabad Accident : पैठणमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघातामध्ये मंगरूळ (Accident In Aurangabad) येथील मृतांमध्ये खेळवणे कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ, दोन सख्ख्या जावा आहेत. मृतांमध्ये अशोक संपत खेळवणे (वय.52), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (45), संजय संपत खेळवणे (42), रंजनाबाई संजय खेळवणे (40), जिजाबाई गणपत खेळवणे (60), संगीता रतन खेळवणे (35) यांचा समावेश आहे. जखमीमध्ये कासाबाई भास्कर खेळवणे (40), सार्थक आजीनाथ खेळवणे (8), आजीनाथ शेषराव खेळवणे (44), गणेश सुखदेव बोरडे (19), आकाश रमेश बोरडे (18), ऋषिकेश गोविंदराव आरके (20), संतोष गणपत खेळवणे (30), धुळाबाई नारायण बोरडे (50), दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (45), ओमकार रतन खेळवणे (16), सुभाष राजेश खेळवणे (45), सुलोचना आत्माराम खेळवणे (55), सुरेश विठ्ठल खेळवणे (50) सर्व रा.मंगरूळ तर कलाबाई बाबू म्हस्के (40, रा.अनवी, ता.सिल्लोड) यांचा समावेश आहे. 6 मृतदेहांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर काही जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात तर काहींना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.

हेही वाचा: औरंगाबाद हादरले! सहा वर्षांच्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची रुग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह मंगरूळ येथे पाठविण्याची व्यवस्था केली. यावेळी रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

Web Title: Six People Died 14 Injured In Accident In Sillod Taluka Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad News
go to top