
छत्रपती संभाजीनगर : तरुणाचा मोबाइल हिसकावून आरोपींनी दुचाकीवर पलायन केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हडको कॉर्नर येथील उद्धवराव चौकात घडली होती. तक्रारदार तरुण आणि सिटी चौक पोलिसांनी स्नॅपचॅटवरून संशयित आरोपींचा शोध घेत काही तासांत त्यांना जेरबंद केले. दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, एक आरोपी पसार झाला.