जेवण व्यवस्थित करत नसल्याचा राग अनावर, मुलाने घेतला वडिलांचा जीव

वडील झोपेत असतानाच त्यांच्या पोटावर, छातीवर आणि गुप्तांगावर लाथा मारून जीव घेतला.
Murder
Murder sakal

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : जेवण व्यवस्थित करीत नसल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने जन्मदात्यालाच संपविल्याची घटना शनिवारी (ता.पाच) मध्यरात्री दहेगाव बंगला (ता.गंगापूर) (Gangapur) येथे घडली. वाळूज पोलिसांनी रविवारी (ता.सहा) सकाळी आरोपीस अटक केली. कडूबाळ मुरलीधर सोनवणे (वय ५५, रा. दहेगाव बंगला) असे मृत पित्याचे नाव असून अनिल सोनवणे (वय २८) खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे. वाळूज पोलिसांनी (Waluj Police) सांगितले की, दहेगाव बंगला येथे मृत व्यक्ती अनिल व सुनील या दोन मुलांसह वास्तव्यास होते. पैकी मोठा मुलगा सुनील हा मुख्य रोडवरील एका हॉटेलमध्ये कामावर होता तर वडिलांसह लहान मुलगा हे घरीच असायचे. (Son Brutally Killed His Father In Gangapur Of Aurangabad)

Murder
नेहमी दुसऱ्यांसाठी धडपणाऱ्या तरुणाचा अवेळी शेवट, मृत्यूने गावावर शोककळा

नेहमीप्रमाणे काम करून शनिवारी रात्री मोठा मुलगा सुनील हॉटेलमध्येच झोपी गेला होता. रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वडील जास्त आजारी असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याने घरी धाव घेतली असता वडिलांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. याबाबत पोलिसांना कळविले. वाळूज ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले असता गंभीर अवस्थेत कडुबाळ सोनवणे यांना उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटीत दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सोनवणे यांना मृत घोषित केले.

Murder
भारत-पाक मॅच वेळी जेवण सोडून टीव्ही समोर ठाण मांडून होत्या लता दीदी

या घटनेनंतर पोलिसांनी मृताचा लहान मुलगा अनिल यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच वडिलांमुळेच आईने जाळून घेऊन जीवन संपविले होते. आता मला ते व्यवस्थित जेवण देत नव्हते. म्हणून शनिवारी रात्री दोघांत भांडण झाल्यानंतर वडील झोपेत असतानाच त्यांच्या पोटावर, छातीवर आणि गुप्तांगावर लाथा मारून जीव घेतल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करून मोठा मुलगा सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com