
उमरगा : शेतकऱ्यांचा कल सोयाबीनचे पीक घेण्याकडे वाढलेला आहे. मात्र, सोयाबीनचे भाव वाढत नाही. शेतकऱ्यांना किमान साडेपाच ते साडेसहा हजार प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा आहे. काढणीनंतर प्रारंभीच्या काळात भावाची चकाकी दिसली. मात्र, त्यानंतर दरवाढीने पुन्हा गुंगारा दिला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची गरजेपुरतीच विक्री केली होती.