
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने गाजावाजा करत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. राज्य सरकारनेही तितकीच तत्परता दाखवत सोयाबीन खरेदी केंद्रे वाढविणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, सोयाबीनमधील १२ टक्के आद्रतेचे प्रमाण वाढवित १५ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी केले जाईल, अशी केंद्राने घोषणा केली.