esakal | सोयगाव: सोयगाव मंडळात पावसामुळे पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पिकांचे नुकसान

सोयगाव: सोयगाव मंडळात पावसामुळे पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोयगाव: सोयगावसह तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयगाव आणि जरंडी मंडळात विक्रमी पावसाची नोंद झाली असून जरंडीच्या कसाईखोरा नाल्याच्या पुरात ४२ वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याने त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी आठ वाजता आढळून आला.

हेही वाचा: सौताडा धबधबा ओसंडून कोसळू लागला; पाहा व्हिडिओ

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात सोयगाव आणि जरंडी मंडळातील ३५ गावांना नुकसानीचा फटका बसला असून प्राथमिक पाहणीत १२ हजार ६५४ हेक्टरवरील खरिपाचे पिके पाण्यात तरंगून उभी होती. त्यामुळे ऐन उत्पन्नावर आलेल्या कपाशी, ज्वारी, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झालेले. सोयगाव मंडळात ११० मी.मी आणि जरंडी मंडळात ८५ मी.मी पाऊस झाल्याने पिके पाण्याखाली गेली होती. खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तहसीलदार रमेश जसवंत यांनी रविवारी नुकसानीची पाहणी केली.

मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला

-जरंडी ता.सोयगाव येथील तरुण विजय लखा राठोड (वय ४२) हा शनिवारी रात्री कसाई खोरा शिवारातील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला. रविवारी सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी भेट दिली. तसेच पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी घटनेचा पंचनामा केला.

निंबायती गावात शिरले पुराचे पाणी

जरंडीच्या धिंगापूर धरणाच्या पाण्याचे सांडव्यातून विसर्ग केल्याने सुकी नदीला मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी रात्री नदीकाठी असलेल्या निंबायती गावात शिरले होते. त्यामुळे ग्रामस्थ भेदरले होते, नदीला मोठा पूर तसेच रामपुरा, न्हावी तांडा, जरंडी, निंबायती गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top