पोलीस ठाण्यांतील आर्थिक व्यवहारांवर ''एसपींची नजर''

पोलीस ठाण्यांतील आर्थिक व्यवहारांवर ''एसपींची नजर''
Published on
पोलिस ठाण्यांतील भ्रष्टाचारावर एसपींची करडी नजर पैशांची मागणी झाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २२: जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात कायदेशीर कामासाठी पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी गप्प न बसता थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे. पोलिस दलातील लाचखोरी आणि आर्थिक गैरव्यवहारांवर आता थेट एसपींची करडी नजर असणार असून, या इशाऱ्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांना बीएनएसएस कलम ३५(३) ची नोटीस बजावणे, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणे, प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर करणे किंवा विविध परवानग्या देण्यासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः नेकनूर, तलवाडा, स्थानिक गुन्हे शाखा, माजलगाव ग्रामीण आणि पेठ बीडसह काही ठाण्यांमधील गैरकारभाराच्या पुराव्यानिशी तक्रारी अधीक्षकांच्या निदर्शनास आल्या. याची अत्यंत गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व अंमलदारांना पारदर्शक कारभाराच्या कडक सूचना जारी केल्या आहेत. पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे की, तक्रारदाराचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, पैशांची मागणी झाल्यास ऑडिओ किंवा व्हिडिओ पुराव्यांसह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. पुराव्यासह तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यांच्यावर केवळ कठोर विभागीय कारवाईच नाही, तर थेट गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही काँवत यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com