

करमाड : भरधाव बसने स्कूटीला दिलेल्या धडकेत दोघे ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. तीन) रात्री साडेनऊच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीतील लिभेर चौकात घडली. साहेबराव हरिभाऊ त्रिगोट (वय ६०) आणि गौतम लक्ष्मण साळवे (वय ५०, दोघे रा. कुंभेफळ) हे अपघातात ठार झाले आहेत.