Thar Bike Accident : भरघाव थारच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार जागीच ठार; बिडकीन परिसर हादरला
Bidkin News : भरधाव वेगात असलेल्या थार कारने फारोळा गावाजवळ दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कामगार विष्णु पाखरे यांचा जागीच मृत्यू झाला.
बिडकीन : शहरातील पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील फारोळा गावाजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या थार कार चालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची घटना काल ता.२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.